#वाल्मिकी ग्रुप न वाल्मिकी सेवा ट्रस्टच्या वतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
व कारवार जिल्ह्यातील (ता. शिर्सी ) हुलेकलचे विभागाचे (आरएफओ) विभागीय अरण्य अधिकारी शिवानंद संभाजी निंगाणी याना जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दाखवलेल्या साहसपूर्ण कामगिरीसाठी २०२४ चे मुंख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे.
गेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात शिवानंद यानी आडीचशेहुन अधिक प्रकराणांचा तपास मार्गी लावला आहे. बेकायदा वन अतिक्रमणाना लगाम घालणे , लाकडाची तस्करी रोखणे,शिकारीला प्रतिबंध यासारख्या कारवाया राबविल्या आहेत .
त्याची दखल घेत पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
यानिवडीलबद्दल वाल्मिकी ग्रुप्स आणि वाल्मिकी सेवा ट्रस्टच्या वतीने आरएफओ शिवानंद निंगाणी यांचा शाल ,पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
एससीएफ एस एस निंगाणी यांचे ते सुपूत्र होत.