रामगुरवाडीच्या शिवारात ८ एकर ऊसाला आग!
गणेबैलाच्या शिवारात १५ एकर ऊसाला आग!
कान्सुलीच्या शिवारात २५ एकर ऊसाला आग!
एकूण ४८ ,एकर जमिनीतील ऊस पिक जळुन खाक!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात सोमवारी दि. २६ रोजी तीन गावच्या शिवारात शार्टसर्किटमुळे ऊसाला आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.
रामगुरवाडी ( ता.खानापूर ) येथील शेतकरी नारायण घाडी आणि सुधीर घाडी यांच्या मालकीच्या ८ एकर जमिनीतील ऊस शार्टसर्किटमुळे सोमवारी दि.२६ रोजी दुपारी जळुन खाक झाला आहे.गरीब शेतकर्याना सरकारने आर्थिक मदत करून सहकार्य करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
गणेबैल ( ता.खानापूर ) गावच्या शिवारात सोमवारी दि. २६ रोजी दुपारी १वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या फडाला शार्टसर्किटमुळे आग लागुन शेतकर्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये सर्वे नंबर २७/२ मधील शेतातील शेतकरी शिवाजी नागाप्पा गुरव व जोतिबा नागाप्पा गुरव यांच्या सात एकर जमिनीतील ऊस, तसेच सर्वे नंबर २९ मधील मारूती बुध्दाप्पा गुरव यांच्या सर्वे नंबर ७३ मधील आनंद परशराम पाटील यांच्या मालकीचा ऊस असा एकूण जवळ पास १५ ते २० एकर जमिनीतील ऊस जळुन शेतकर्याचे नुकसान झाले.
शार्टसर्किटमुळे आग लागताच शेतकर्यानी आग्नीशामक दलाला संपर्क साधुन घटनेची माहिती दिला.लागलीच आग्नीशामक दलाच्या जवानानी घटनास्थळी धाव घेऊन ऊसाला लागलेली आटोक्यात आणली.
एन सुगीच्या काळात शेतकर्याच्या उसाला आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान झाले.त्यामुळे नुकसान ग्रस्थ शेतकर्याना सरकारने आर्थिक मदत करून सहकार्य करावे.अशी मागणी गणेबैल गावच्या शेतकर्यातुन होत आहे.
सोमवारी गणेबैलाच्या शिवारात शार्टसर्किटमुळे ऊसाला आग लागल्याची घटना ताजी असताना कान्सुली (ता. खानापूर) गावच्या शिवारात हेस्काॅमच्या विधुत ट्रान्सफार्मर मधुन आगीची ठिणगी पडल्याने सुमारे २५ एकर जमिनीतील ऊस पीक जळुन खाक झाला.त्यामुळे शेतकर्याचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे नुकसान ग्रस्थ शेतकर्याना सरकारकडुन नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी कान्सुली भागातील शेतकर्यातुन होताना दिसत आहे.
कान्सुलीच्या शिवारात ट्रान्सफार्मर
मधील आगीच्या ठिणगीने ऊसाला आग!
कान्सुली शिवारातुन मिळालेल्या माहिती नुसार शेतकरी राजु किनेकर व रामू
कालमनकर याची शेती आल्लोळी
गावाकडे जाणार्या रस्त्याला लागुन आहे. याच ठिकाणी हेस्काॅमखात्याचा ट्रान्सफार्मर बसविलेला आहे. याच ट्रान्सफार्मर मधुन आगीची ठिणगी पडल्याने उसाला आग लागली. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यामध्ये जोतिबा पाटील, पांडु गुरव, मारूती गुरव, रामू गुरव, बाळू गुरव आदीच्या जवळपास २५ जमिनीतील ऊसाच्या पिकाला आग लागुन नुकसान झाली आहे.
लैला शुगर्सचे शेतकरीअधिकारी बाळासाहेब शेलार याची घटनास्थळी भेट!
लैला शुगर्सचे शेतकरी अधिकारी बाळासाहेब शेलार हे याच वेळी अल्लोळी गावाहुन येत असताना आगीची घटना दृष्टीस पडली.लागलीच घटनास्थळी धाव घेऊन आग्नीशामक दलाच्या जवानाना घटनेची माहिती दिली.लागलीच आग्नीशामक दलाच्या जवानानी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न झाले.मात्र ऊस जमिनीचे क्षेत्र मोठे असल्याने मोठे नुकसान झाले.

