#तर वडगावचा स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब द्वितीय.!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खास दसरा,दिवाळी निम्मित जय गणेश युवक मंडळ यांच्यावतीने हाफ पीच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन गर्लगुंजी येथे करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातील ३० संघानी भाग घेतला होता प्रथम क्रमांक साठी १५५५५ रु.आणि ट्रॉफी
द्वितीय क्रमांक साठी १११११ आणि ट्रॉफी अशी बक्षीस होती, ४ रात्र ह्या स्पर्धा चालल्या होत्या या सर्व संघामधून उत्कृष खेळी करत अटी तटीच्या झालेल्या सामन्यात ओमकार यांच्या गोलंदाजीतील चतुराईने श्री गणेश स्पोर्ट्स क्लब जुने बेळगाव यांनी प्रथम क्रमांक मिळविला.तर द्वितीय क्रमांक स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब वडगाव यांनी मिळविला.उत्कृष फलंदाज आदित्य वारंग, मालिकावीरचा मान मनीष यांना मिळाला.बक्षीस वितरण कार्यक्रमाला गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील,शिक्षक सत्तापा पाटील,उद्योजक दिगंबर भातकांडे,मंडळांचे अध्यक्ष सतीश पाटील,सुरज पाटील,जोतिबा सुतार,संदीप पाटील,सुरज यलारिचे,दत्ता पाटील,समालोचक राहुल पालकर,अंपायर दत्ता देसाई,विक्रम पाटील,भुजंग मेलगे,निखिल शिंदे, ज्ञानेश्वर सिद्धानी,निखिल पाटील,भुजंग लोहार,अनंत पाटील आणि इतर उपस्थित होते. खेळा बरोबर विद्यार्थी मित्रांनी अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजेत,कारण गाव आणि तालुक्यामध्ये सर्वत्र खेळाची सुगी चालू आहे खेळ हे शरीरासाठी खूप गरजेचे आहेत,मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळले पाहिजेत आणि मैदानी खेळ जपले पाहिजेत पण गणपती उत्सव,दसरा उत्सव आणि आता दिवाळी मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे त्यात गावोगावी भरविल्या जाणाऱ्या स्पर्धा आणि शर्यती यातून शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे त्यामुळे खेळा बरोबर अभ्यास ही तितकाच महत्वाचा आहे असे मत बक्षीस वितरणवेळी पाहुण्यांनी मांडले.