#खानापूरात गो सम्मान आवाहन अभियान संपन्न!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
भारतात गोहत्या पूर्णपणे बंद व्हायला हवी.एवढेच नव्हे तर गोहत्या करणार्याला फाशी शिक्षा व्हावी.अशी सरकारने कायद्यात तरदुत करणे गरजेचे आहे. तसेच गोमातेला राष्ट्र मातेचा सन्माननीय दर्जा देण्यात यावा.गो सेवेसाठी एक केंद्रीय कायदा बनवाना आणि केंद्रीय गोमंत्रालय स्थापन करावे.अशी मागणी श्री ग्वालानंद सरस्वती,पुष्कर धाम स्वामीनी मंगळवारी दि. २७ रोजी खानापूर येथील रेल्वेस्टेशन मारुती मंदिरात गो सम्मान आवाहन अभियान कार्यक्रमात बोलताना केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी बेळगाव जिल्हा निलेशजी गोरक्षक होते.
पुढे बोलताना स्वामी म्हणाले की, येत्या १७ डिसेंबर रोजी गो सम्मान दिवस बेगळुर येथे होणार आहे.तेव्हा बेळगाव जिल्ह्यातुन लोखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना खानापूर तालुका संयोजक शार्दुल जोशी म्हणाले की , गो सम्मान आवाहन अभियानचे मुख्य उद्देश म्हणजे संपूर्ण भारतात गो हत्यावर पूर्णताबंदी घालुन गो सुरक्षिता झाली पाहिजे.कारण अलिकडे रासायनिक खताचा वापर त्यामुळे आयुष्य कमी होत चालले आहे.गो मातेचे शेण खत, गोमुत्र याचा वापर केल्यास पिके चांगली वाढतील आणि मनुष्याचे आरोग्य चांगले राहिल, तेव्हा सरकारने गोमंत्रालय उभारावे. असे विचार व्यक्त केले.
बेळगाव जिल्ह्याचे मुकुंद कित्तूर, खानापूर तालुका प्रभारी विजय होळकर, खानापूर तालुका सहप्रभारी बसवंत सुतार, खानापूर तालुका संयोजक शार्दुल जोशी, सह संयोजक दीपक वाळवे,हस्ताक्षर प्रभारी जयप्रकाश बाळकट्टी आदी उपस्थित होते.