#तालुक्यातील १० पी के पी सोसायटीना मिळणार २५ लाखाचा निधी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पी के पी एस सोसायटीच्या गुडावुणसाठी २५ लाखाचा निधी मंजुर झाल्याची माहिती खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी खानापूर पी के पी एस सोसायटीच्या सभागृहात पार पडलेेल्या बैठकीत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य विद्यामान चेअरमन नारायण कार्वेकर होते.
प्रारंभी मॅनेजर दत्ता बेळगावकर यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी बैठकीचे औचित्य साधून आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा चेअरमन नारायण कार्वेकर यांच्याहस्ते शाल ,पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की सरकारकडुन पी के पीएस सोसायटीच्या गुडावुणसाठी २५ लाखाचा निधी मी प्रयत्न करून तालुक्यातील १० पी के पी एस सोसायटीना प्रत्येकी २५ लाखाचा निधी मंजुर केला आहे. तालुक्यातील पी के पी एस संचालकानी डी सी सी बॅकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून निधी मंजुर करून आणल्याचा समज प्रत्येकाने दुर करावा. मला मतदान करा अथवा न करा. मी आमदार या नात्याने तालुक्यातील १० पी के पी एस सोसायट्याना प्रत्येकी २५ लाखाचा निधी मंजुर केला आहे. असे स्पष्ट सांगीतले.
तेव्हा खानापूर पी के पी एस सोसायटीने डी सी सी बॅकेच्या निवडणुकी मला मतदान करा.अथवा न करा असे बोलुन दाखविले.
तेव्हा खानापूर पी के पी संचालकानी माजी आमदारानी व डीसीसी बॅक संचालकानी नारळाची शपथ देऊन गेले आहेत.याची भिती बोलुन दाखविली आहे. याचे आम्ही काय करू असे बोलुन दाखविले. यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर सोसायटीच्या प्रगतीबद्दल माहिती समजावून घेतली. व मार्गदर्शन केले.
यावेळी चेअरमन नारायण कार्वेकर,संचालक नारायण भगवंत पाटील,अशोक बाबाजी पाटील ,सुरेश सुळकर,शंकर पाटील ,ओमणा नाईक ,संचालिक श्रीमती सुनिता बिर्जे आदी उपस्थित होते.