संदेश क्रांती न्यू्ज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी (ता खानापूर ) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित श्रीमहालक्ष्मी एज्यूकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवी महाविद्यालयात बी बी ए आणि बी सी ए पदवी अभ्यास क्रमांचा शुभारंभ उद्या शनिवारी दि.१९ रोजी सकाळी १० .३० वाजता होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डाॅ.एस विद्याशंकर ,विश्वेश्वरय्या टेक्नाॅलाॅजिकल युनिर्व्हसिटी बेळगांव उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला प्रा.बंडू एल.मजुकर चेअरमन शांतिनिकेतन पदवी महाविद्यालय संचालक, प्रा.भरत एम.तोपिनकट्टी उपाध्यक्ष श्री महालक्ष्मी ग्रुप एज्यूकेशन सोसायटी तोपिनकट्टी,शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर , सचिव प्रा.आर.एस.पाटील ,जाईट डायरेक्टर महादेव बांदेवडीकर आदी उपस्थित राहणार आहेत.