#आमदार विठ्ठलराव हलगेकर याना निवेदन!
संदेश क्रांती न्युज:
खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता. खानापूर ) येथील उप प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कायमस्वरूपी तज्ञ एम बी बी एस डाॅक्टरची नेमणुक करावी.अशा मागणीचे निवेदन चापगांव ग्राम पंचायतीचे माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी दि.१७ रोजी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना देण्यात आले.
यावेळी निवेदनात म्हटले आहे. की चापगांव ग्राम पंचायत हद्दीत अनेक गावाचा समावेश आहे. तेव्हा चापगांवच्या उपप्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ञ एम बी बी एस डाॅक्टराची नेमणुक करावी.अशी मागणी करण्यात आली .
यावेळी निवेदन देताना चापगांव ग्राम पंचायतीचे माजी ग्राम अध्यक्ष रमेश धबाले, प्राथमिक मराठी शाळेचे एस डी एम सी अध्यक्ष मष्णू चोपडे, बेळगा़व जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव दळवी, मष्णू सुतार नागराज धबाले ,प्रभू कदम आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्याचे आश्वसान दिले.