#अंगणवाडीला ,ग्रामपंचायतीना ,शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र !
#ग्रंथालयाची केली पाहणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापुर प्रतिनिधी
खानापूर शहरातील तालुका पंचायत कार्यालयासह तालुक्यातील ग्रंथालयाना ,विविध ग्राम पंचायतीना ,तसेच अंगणवाडीना प्रोबेशनरी आयएएस अधिकारी अभिनव जैन यानी गुरूवारी दि.१७ रोजी धावती भेट देऊन पाहणी केली
प्रांरभी खानापूर तालुका पंचायत कार्यालयाला भेट दिली. यावेळी विविध विभाग,उपक्रम ,तसेच कर्मचार्याची उपस्थितीची माहिती घेतली.
यावेळी तालुका पंचायतीचे मॅनेजर यानी एस.एस.सपडला यानी त्याचे स्वागत केले.यावेळी सहाय्यक संचालिका रूपाली बडकुंद्री, विजयकुमार कोथिन ,एस सी जलगेरी,राजू तलवार,सागरकुमार बिरादार,नेत्रावती एम डी, व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
तालुक्यातील हिरेहट्टीहोळी ग्राम पंचायतीला भेट दिली. यावेळी मनरेगा ,गृहनिर्माण योजना , जलजीवन मिशन सह ग्रंथालय आदी योजनाची पाहणी केली. व माहिती मिळविली.
याजबरोबर तालुक्यातील अंगणवाडीना,प्राथमिक शाळाना,प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी देऊन आढावा घेतला.
यावेळी अंगणवाडीतील बालकाशी संवाद साधुन समाधान व्यक्त केले.