संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तिर्थक्षेत्र पंढरंपूरच्या आषाढी एकदशीसाठी पायी दिंडी दक्षिण गोवा येथील संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ मणतुर्गा (ता.खानापूर ) येथे मंगळवारी दि २४ रोजी दाखल झाली.
दि.२० जून रोजी दक्षिण गोवा येथून पायी दिंडीला प्रारंभ झाला.गोव्यातील कोणकोण बाली,सावर्डे,मोलम,आनमोड,आखेती,मेडा,हुन आज मंगळवारी दि.२४ रोजी मणतुर्ग्यात आली.
यावेळी मणतुर्गा वासीयानी संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाचे स्वागत केले. पायी दिंडीची सेवा केली.यावेळी दिंडीचा मुक्काम मणतुर्ग्यात करण्यात आला.
ही सेवा करण्यासाठी मणतुर्गा गावचे भाविक शांताराम पाटील,मल्लू देवलतकर,चांगदेव मागेलकर,बळीराम देसाई,मारूती पाटील ,अरूण पाटील,मनोहर गुंडपीकर,बालाजी पाटील,प्रभाकर बोबाटे,प्रकाश पाटील,दत्तू पाटील,विजय भटवाडकर,दिपक पाटील,बळवंत देसाई,आदीनी पायी दिंडी वारकर्याची सेवा केली.