संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
१९ आँक्टोंबर रोजी होणार्या डीसीसी बॅकेच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यातुन मी निवडणुक लढवित आहे.अशी माहिती गर्लगुंजी पीकेपीएस सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यामान संचालक राजू मारूती सिध्दाणी यांनी मंगळवारी दि.२४ रोजी खानापूरात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की गेली सात वर्षे मी गर्लगुंजी पीकेपीएस सोसायटीच्या संचालक व माजी चेरमन म्हणून कार्यरत आहे.
खानापूर तालुक्यात ५८ पीकेपीएस सोसायट्या आहेत. यासर्व सोसायट्याशी माझा घनिष्ठ संबध आहे. तालुक्यातील संस्थाना भेटी देऊन तेथील अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही संस्थाना दहा ते बारा वर्षे पत मंजूर केल्या नाहीत, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झिरो टक्के व्याज व इतर काही सुविधा पुरवल्या जातात त्या सुविधा पासून तालुक्यातील काही संस्थांचे हजारो शेतकरी वंचित आहेत, काही वेळा शासनाने कर्जमाफी केली अशा लाभदायक योजनेपासून पत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा झाला आहे
असा अन्याय शेतकर्यावर पुन्हा होऊ नये.शेतकर्याना वेठीस धरण्याचा प्रकार थांबावा. शेतकर्याचे हित जोपण्याचे सोडुन आडचणी आणण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. हे थांबावे.
तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी पासून वंचित ठेवून बाहेरच्या तालुक्यातील युवकाना रोजगारची संधी देण्यात आली.हे कुठेतरी थांबले पाहिजेत. केवळ तालुक्यातील मताचा फायदा घेत डीसीसी बॅकेवर सत्ता मिळविण्यात येत आहे. हे बदलावे.
संस्थांच्या संचालक मंडळ व तेथील कर्मचारी वर्ग या सर्वांना विश्वासात घेऊन आपुलकी व पारदर्शक असा व्यवहार आणण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असेल त्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने सर्वाना निवडणुक लढविण्याचा हक्क आहे. म्हणून मी सुध्दा ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.
खानापूर तालुक्यातील सर्व संस्थांच्या संचालक मंडळाला मी नम्र विनंती करतो की 19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा असे . असे मत गर्लगुंजी पीकेपीएस सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यामान संचालक राजू सिध्दाणी यानी व्यक्त केले