#जंगलीप्राण्याचे भय, आंधाराची वाट!
#बसडेपो अधिकार्याची भेट!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधखानापूर निलावडे मुगडा बस खानापुरातून
गेल्या पंधरा दिवसापासुन सायंकाळी उशीरा सहा वाजता सुटत असल्याने निलावडे, मुघवडे परीसरातील कबनाळी,जोगमठ,
,कोकणवाडा,बांदेकरवाडा,आंबोळी,मळव आदी गावच्या विद्यार्थ्याना घरी जाऊन पोहचण्यास रात्र होत आहे.घनदाट जंगलातुन रात्रीच्या आंधारातुन हिस्त्रप्राण्याचे भय यामुळे विद्यार्थ्या च्या जीवाला धोका आहे.
याची दखल घेऊन निलावडे ग्राम पंचायतीचे माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर
यानी खानापूर तालुका ब्लाँक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर बसडेपो कंट्रोलर श्री.लमाणी यांची भेट घेऊन समस्या मांडली.
विनायक मुतगेकर म्हणाली की, खानापूर निलावडे मुघवडा बस रोज. संध्याकाळी ५ वाजता सुटत होती,मात्र गेल्या पंधरा दिवसापासुन संध्याकाळी खानापूरातून ६ वाजता सुटून रात्री ८वाजता मुघवडे ये थे पोहचत आहे.
याभागातील विद्यार्थ्यानी रात्रीच्यावेळी घनदाट जंगलातुन,आंधारातुन वाट काढत हिस्त्रप्राण्याच्या भितीने घरी पोहचायला ९ वाजत आहे. तेव्हा विद्यार्थ्याच्या जीवाला धोका पोहचत आहे.
याभागातील लोकाच्या समस्या असतीलतर मलाच विचारतात, यासाठी आमदार हलगेकर याना संपर्क केला असता, त्यानी संपर्क केला नाही .यासाठी शनिवारी बसडेपो अधिकार्याच्या समस्या मांडली.
तेव्हा सोमवार पासुन खानापूर निलावडे मुघवडे सायंकाळी पाच ते साडे पाचवाजता
सोडवी, अशी मागणी केली.
यावेळी अँड ईश्वर घाडी यानी बसडेपो अधिकार्याना जंगलभागातील विद्यार्थ्याची परिस्थितीची जाणीव करून दिली.यावेळी काॅग्रेसचे नेते सूर्यकांत कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बसडेपो कंट्रोलर श्री लमाणी बस वेळेत पाठविण्याचे आश्वासन दिले.