#नेते मंडळीच्या शुभेच्छांचा वर्षाव!
#भजनी मंडळाचा कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
युवा नेते तसेच खानापूर तालुका विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष त्याच बरोबर मन मंदिर सौहार्द सोसायटीचे संस्थापक, अध्यक्ष व आमदार विठ्ठल हलगेकर यांचे उजवा हात व कट्टर समर्थक व स्वातंत्र्य सैनिक दत्त पाटील सन्नहोसुर यांचे नातू श्रीमान भऱमाणी पाटील यांचा मंगळवारी दि १ सप्टेंबर रोजी मन मंदिर सौहार्द सोसायटीच्या सभागृहात वाढदिवस उत्साहात साजरा झाला आहे.
त्याच्या वाढदिवसानिमित्त खानापूर शहरातील भजनी मंडळ तसेच माळ अंकले भजनी मंडळाच्या भजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
य़ावेळी भाजप नेते , माजी तालुका पंचायत उपसभापती मल्लापा मारीहाळ यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
वाढदिवसानिमित्त श्रीमान भरमाणी पाटील यानी केक कापून वाढदिवस साजरा केला.
यावेळी उपस्थित मान्यवरानी भरमाणी पाटील यांच्या कार्याबद्दल. गोड कौतुक करत केक भरविला.तसेच त्याना दीर्घायुष्य लाभो.अशी सदिच्छा व्यक्त केली.युवा नेते भरमाणी पाटील यांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलु आहे.धडाडीचे व्यक्तीमत्व सर्वाशी आदराने वागणे,प्रत्येकांच्या आडीअडचणीना धावुन जाणे,त्यामुळे ते सर्वाचे प्रिय नेते अशी ओळख आहे.
त्याच्या वाढदिवस दिन शुभेच्छा देण्यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्या सौभाग्यवती सौ.रुक्मिणी विठ्ठल हलगेकर, भाजप नेते राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी, मा जी तालुका अध्यक्ष संजय कुबल,शहर अध्यक्ष अँड चेतन मणेरीकर,माजी तालुका पंचायत उपसभापती मल्लापा मारीहाळ, राजू सिध्दाणी,किशोर हेब्बाळकर,मनोहर कदम,भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच खानापूर तालुक्यातील राजकीय,शैक्षणिक, व सामाजिक क्षेत्रातील नेते , कार्यकर्ते, मित्रपरिवार व हित चिंतक आदीच्याकडुन श्रीमान भरमाणी पाटील यांच्या वर वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी बोलताना युवा नेते भरमाणी पाटील म्हणाले की,आपण दिलेल्या प्रत्येक शुभेच्छेमुळे मला नव्या उर्जेचा आणि सकारात्मकतेचा अनुभव मिळाला.हीच ताकद पुढील वाटचालीस प्रेरणादायी ठरेल, आपण दाखविलेल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे मी आधीक जबाबदारीने आणि प्रामाणिक पणे समाजासाठी काम करत राहीन हीच आपणा सर्वाना दिलेली माझी मनापासुन ग्वाही.असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी उपसभापती व भाजप नेते मल्लापा मारीहाळ यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून शेवटी सर्वाचे आभार मानले.
