संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासुन पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने खानापूर शहरासह तालुक्यातील शाळाना गळती,रस्त्याची दुरावस्था,झाडांची पडझड सुरूच आहे.
खानापूरातील चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळेच्या इमारतीला गळती”
सतत पडणार्या पावसामुळे चिरमुरकर गल्लीतील सरकारी मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीला गळती सुरू झाली आहे. वर्गखोलीत गळती सुरू झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.त्यामुळे विद्यार्थ्याना वर्गात बसुन शिक्षण घेणे कठीण होत आहे.तेव्हा शिक्षण खात्याने तसेच एसडीएमसी व शिक्षण प्रेमीनी लक्ष देऊन गळतीची समस्या दुर करावी.
खानापूर पारिश्वाड रोडवरील पुलावर तळ्याचे स्वरूप!
खानापूर पारिश्वाड रोड वरील नाल्याच्या पुलावर तळ्याचे स्वरूप आले आहे.यापुलावरील डांबर वाहुन गेल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यातच सतत पडणार्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचुन पुलावर तळ्याचे स्वरूप आले आहे.केवळ कंत्राटदाराच्या हालगर्जी पणामुळे व निकृष्ट कामामुळे लाखो रूपयाचा निधी वाया गेला असुन
पुलावरील खड्ड्यामुळे पाणी साचुन वाहन धारकाना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यात झाडांची पडझड !
तालुक्याच्या घनदाट जंगलभागात गेल्या चार दिवसापासुन मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड होऊन विजपुरवठा खंडीत होत आहे.
अति जंगलभागातील जामगाव गावात रस्त्यावर मोठे झाड कोसळुन विधुत खांब,विधत ताराचे नुकसान झाले.तर
गावात आधारांचे सम्राज्य पसरले.त्यामुळे दैनदिन जीवन विस्कळीत झाले.तेव्हा हेस्काॅम खात्याने वीज पुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी जामगाव ग्रामस्थातुन होत आहे.
सध्या सतत पडणार्या पावसामुळे मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याचा साठा होत आहे.