#मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ!
#हलात्री नदीवरील पुल वाहतुकीला बंद!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासुन खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस पडत असल्याने बुधवारी मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आहे.
तर खानापूर हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवरील पुला पाण्याची पातळी वाढल्याने या मार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद झाली.
त्यामुळे यामार्गावरील वाहतुक मणतुर्गा मार्गे असोगा खानापूर अशी करण्यात आली आहे. परंतु असोगा मार्गे असलेल्या रेल्वे स्थानकाजवळ भूयारी रेल्वे मार्गाचे काम हाती घेतल्याने याठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनधारकाना मोठी समस्या निर्माण झाली आहे.
यावेळी क्राॅग्रेसचे नेते व मणतुर्गा गावचे सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बोबाटे यानी हालात्री नदीवरील पुलावर पाण्याची पातळी वाढत आहे. तेव्हा पुलावरून जाण्याचे धाडस करू नये. असे आवाहन केले.
खानापूर तालुक्यात मंगळवार पासुन संततधार पाऊस पडत आहे.यावेळी जिल्हा पंचायतीचे सी ई ओ राहुल शिंदे यानी हालात्री नदीवरील पुलाची पाहणी केली. व सतर्कतेचा इशारा दिला.
तर जिल्हा अधिकारी महमद रोशन यानी अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यासह बेळगाव तालुक्यातील आंगणवाडी ,प्राथमिक,माध्यमिक तसेच पदवीपूर्व काॅलेजना आज बुधवारी सु्ट्टी जाहिर केली आहे.
बुधवारी ही सकाळपासुन धुवाधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यानी पाण्याची पातळी पार केली आहे.