# शेतकरी रक्तबंबाळ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात जंगली प्राण्यांचे हल्ले हे काय नविन नाही.कधी गवीरेड्याचा हल्ला,तर कधी अस्वलाचा हल्ला हे सत्र सुरूच आहे.
चापगांव (ता.खानापूर )गावच्या शिवारात अस्वलासह पिल्लाचा वावर असल्याने शेतकर्याना शेतात जाणे कठीण झाले आहे. तर कधी शेतकर्याच्या दृष्टीस पिल्लासह अस्वल पडत आहे.त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असुन ही घटना ताजी असतानाच कणकुंबी (ता .खानापूर ) येथील चेकपोस्ट जवळ आज बुधवारी दि २५ रोजी कणकुंबीचा शेतकरी सकाळी जनावरे चारावयास कणकुंबी चेकपोस्टजवळुन जात असताना अस्वलाने शेतकरी दशरथ वरंडेकर (वय ५५) हल्ला चढविला .त्यात ते रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले.
चेहर्यावर गंभीर ईजा झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कणकुंबीचे आर एफ ओ शिवकुमार यानी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धावा घेऊन लागलीच शेतकर्याला उपचारासाठी बेळगाव जिल्हा सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. सध्या कणकुंबीत धुवाधार पाऊस पडतो.तर पावसाळ्या जंगली प्राण्याचे हल्ले हे ठरलेलेच आहे. त्यामुळे याभागातील नागरीक भयभित झाले आहेत.
तेव्हा वनखात्याने जंगली प्राण्यापासुन होणारे हल्ले थांबवावे .अशी मागणी नागरीकांतुन होत आहे.