#निवृत्त कर्मचार्यांचा सह भाग !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
निवृत्त कर्मचारांच्यावतीने केंद्र व राज्य पेन्शन धारकांच्या हिताच्या विरोधात केंद्र सरकारने मंजुर केलेल्या विधेयकाच्या निषेधार्थ तहसीलदारांच्या मार्फत पंतप्रधानाना बुधवारी दि.२५ रोजी निवेदन सादर केले,
निवेदानात म्हटले आहे की, दि.२५ मार्च २०२५ रोजी कोणतीही पूर्व सुचना नदेता केंद्र सरकार ने निवृत्ती विधेयकाचा एक भाग म्हणून कायदा सादर केला.लोकसभेने त्याला मंजूरी दिली.
मात्र केंद्रीय वेतन आयोगाच्या कार्यकाळापूर्वी कार्यरत असलेल्या निवृत्तीवेतन धारकांच्या वेतन आयोगाच्या शिफारशीचा लाभ गमावतील .व विद्यामान निवृति वेतन धारकाना निवृत्ति वेतन वाढीचा हक्क मिळणार नाही.
तेव्हा निवृत्ती वेतन योजनेच्या उद्दीष्ठांचा लाभ निवृत्त वेतन धारकाना मिळावा.
तसेच दि.१ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्या विद्यमान निवृत धारकांचे यात मोठे नुकसान होणार आहे. असे नमुद केले आहे.
तेव्हा या विधेयकाच्या निषेधार्थ तहसीलदारांच्या मार्फत पंतप्रधाना निवेदन सादर केले.
निवेदन देताना कार्यदर्शी सी एस पवार , एम जी. बेनकट्टी, पी बी कडेमनी ,ए जी देशपांडे,बी बी मुरगोड,कुश कुंभार आर.बी.सत्यगेरी, श्रीमती ए एम बोर्जीस,एल डी पाटील,बी व्ही गडाद,एफ एन तलवार ,श्री.कुंदरगी,आय के ओऊळकर,एस एस जगजिणी,आय आय मिनाज आदी निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
