संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हत्तरवाड ( ता. खानापूर ) येथील नव्याने जिर्णोद्धार केलेल्या श्री मारुती मंदिराचा लोकार्पण सोहऴा गुरुवार दि.२६ मार्च ते शनिवार दि. २८ मार्च पर्यंत साजरा होणार आहे.
गुरुवार दि.२६ मार्च रोजी दुपारी दोन वाजता गावामध्ये शोभायात्रा होईल व सायंकाळी सात वाजता राक्षोगन होम नंतर महाप्रसाद व रात्री मराठी प्राथमिक शाळा हत्तरवाड या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल शुक्रवार दि.२७ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसा रोहन श्री सिद्ध हंडी भडंगनाथ कुंभार्डा मठाचे मठाधिश यांच्या हस्ते व दुपारी महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी सात वाजता ह भ प परसराम बाळू भक्तीकर चिरमुरी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल व रात्री महाप्रसाद होईल शनिवार दिनांक २८ मार्च रोजी सकाळी दहा वाजता मंदिराचा उद्घाटन सोहळा व दुपारी महाप्रसाद होईल व त्यानंतर सन्मान सोहळा व रात्री महाप्रसाद नंतर रात्री नऊ वाजता दर्डा सिंग दरोडा हा तीन अंकी नाट्यप्रयोग होणार आहे. असे संयोजक समस्त हत्तरवाड ग्रामस्थ व बांधकाम विश्वस्त मंडळ हत्तरवाड यानी कळविले आहे.
