#पेट्रोल,डिझेलची टंचाई नाही. पेट्रोलपंप मालकांचे म्हणने!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या युध्दामुळे पेट्रोल , डिझेलची टंचाई होणार या अफवे मुळे मंगळवारी दि.२४ रोजी खानापूर शहरातील वर्दे पेट्रोल पंप,माकावी पेट्रोल पंप,होसमनी पेट्रोल पंप, आदी पेट्रोल पंपावर वाहनधारकानी एकच गर्दी केली होती.ऐवढेच नव्हेतर पेट्रोल,डिझेल भरण्यासाठी घरातुन बाॅटल् सुध्दा घेऊन नागरीकानी गर्दी केली होती.
सोमवारीच पेट्रोल, डिझेलची टंचाईच्या अफवेने लोकात मोठी घाबराट पसरली होती.
मंगळवारी पहाटेपासुनच पेट्रोल पंपावर नागरीकांनी गर्दी केली.प्रत्येक जन आपली वाहने गर्दीतुन पुढे ढकलत जाताना बराच वेळा वादावादीचे प्रकार घडत होते.
मंगळवारी दिवसभर पेट्रोल पंप गर्दीने गजबजलेेले होते.
पेट्रोलपंप मालकाचे आवाहन !
खानापूर शहरातील वर्दे पेट्रोल पंप, माकावी पेट्रोलपंप, होसमनी पेट्रोलपंपचे मालक वाहन धारकाना पेट्रोल, डिझेलची टंचाई होणार नाही.कोणत्याही अफेवर विश्वास ठेवू नका.ऐवढेच नव्हेतर कोणीही बाँटल, कॅन घेऊन ये ऊ नये.वाहनाशिवाय पेट्रोल, डिझेल देण्यात येणार नाही.असे आवाहन यावेळी केले.
य़ावेळी खानापूर शहरात केवळ पेट्रोल , डिझेलसाठी गर्दी दिसुन येत होती.खेड्यापाड्यातील नागरिक गरजेपेक्षा जास्तच पेट्रोल, डिझेल घेऊन जाताना दिसत होते.
मात्र आजुन पेट्रोल, डिझेलचा तुडवटा भासणार नाही.असे सांगण्यात येत आहेत.
