#शिवस्मारक चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे. निधी वाया जाण्याची भिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील नेहमीच गजबजलेल्या शिव स्मारक चौक ते रेल्वेस्टेश या रस्त्याच्या डांबरीकरीणासाठी ७५ लाखाचा निधी मंजुर करून डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली.तेव्हा यारस्त्याला जोड रस्ता असलेल्या मिशन कंपाऊड रस्त्याचे डांबरीकरण व्हावे. अश्या मागणीचे निवेदन मिशन कंपाऊड परिसरातील नागरीकानी नगरपंचायतीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे.की, संध्या शिवस्मारक चौक ते रेल्वे स्टेशन पर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण होत आहे.याच रस्त्याला मिशन कंपाऊडला जाणारा रस्ता लागुन आहे.तेव्हा मिशन कंपाऊड रस्त्याचे डांबरीकरण व्हावे. तसेच याभागात फेव्हर्स बसविले आहेत. त्याची डागडुजी व्हावी. अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदन देताना ॲड गजानन देसाई,किरण कामत, अप्पू बालकट्टी, राजेंद्र रायका, अजीत सैल,बाबू शेट्टी, केनचप्पा, नैसरीकर,अमित आयंगार,स्वप्निल देसाई,सतीश देसाई आदी उपस्थित होते.
शिवस्मारक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे डांबरीकरण उत्कृष्ट दर्जाचे करा!
शिव स्मारक चौक ते रेल्वेस्टेश रस्त्याचे डांबरीकरण हे निकृष्ट दर्जाचे होत आहे.त्यामुळे खानापूर शहरवासीयातुन कामात भ्रष्टाचार तसेच कंत्राटदारांची मनमानी होत असल्याचे सुर उमटत आहेत.
ऐवढेच नव्हेतर पत्रकार विवेक गिरी व विशाल सावंत यानी रस्त्याच्या डांबरीकरणाला ७५ लाखाचा निधी मंजुर असुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम का होत आहे.असा आरोप करत नाराजी व्यक्त करत संबधीत कमत्राटदाराला कामाचा दर्जा सुधारण्यास सांगीतले असता,अरेरावीची उत्तरे देत उध्दट भाषेत बोलल्याचा आरोप नागरीकानी केला.
या मागचे गैंडबंगाल काय आहे.असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारण हा रस्ता महत्वाचा आहे.यारस्त्यावरून रेल्वे प्रवाशी ये जा करतात.याच रस्त्यावर तहसील कार्यालय,पी डब्ल्यू डी कार्यालय,नगर पंचायत , पोस्ट आँफिस, सर्वोदय स्कूल ,असल्याने रहदारीचा रस्ता आहे.तेव्हा उत्कृष्ट दर्जा चा रस्ता होणे गरजेचा आहे.
तेव्हा लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष दे ऊन कामाचा दर्जा पाहावा.व कंत्राटदाराला समज द्यावी. अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील असा ईशारा नागरीकांनी दिला आहे.

