#रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य सुपुर्द!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी :
सिंगीनकोप ( ता. खानापूर )येथील कुंभार समाजातील स्वाती संतोष कुंभार यांच्या घराला सोमवारी दि.९ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागुन घर संपूर्ण जळुन खाक झाले.
आगीत दहा लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.
याघटनेची माहिती बेळगाव येथील दक्षिण काशी कपलेश्वर मंदिर ट्रस्ट मिळताच, कपलेश्वर मंदिर ट्रस्टचे अक्षय लगडे, रमेश देसुरकर,अविनाश खन्नुरकर,आ दी नी शनिवारी दि.१५ मार्च रोजी सिंगीनकोप गावाला भेट देऊन कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने रोख पाच हजार रूपये रक्कम,तसेच संसार उपयोगी साहित्य स्वाती कुंभार यांच्याकडे सुपुर्द केले.
या वेळी मा जी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार व ग्रामस्थानी बेळगावच्या कपलेश्वर मंदिर ट्रस्ट कडुन मिळालेली भरघोस मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.
सोमवारी सायंकाळी स्वाती कुंभार या शेतातुन घरी आल्या त्याचवेळी घरातुन अचानक धुराचा लोट आला. आणि बघता बघता आगीचा भडका उडाला.त्याचवेळी स्वाती यानी आरडाओरड करताच शेजारी लोक धाऊन आले. इतक्यात आगीने रूद्ररूप धारण केले.आग मोठ्या प्रमाणात भडकली.गावातील नागरीकानी आग विजण्याचा आटोकाट प्रयत्न केला.मात्र आगीने चारी बाजुने घेरले.लागलीच आग्निशामक दलाच्या जवानाना पाचरन करण्यात आले.
लागलीच अग्निशमक दलाच्या जवानानी घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नानी आग विजविण्याचाप्रयत्न केला.
स्वाती कुंभार याचे कौलारू घर असल्याने आगीने अधिकच रुद्र रूप घेतले.त्यामुळे आग आटोक्यात ये ऊ शक ली नाही.
मात्र आग्नीशमक दलाच्या जवानाच्या व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आजूबाजुच्या घराना आगीपासुन वाचविण्यात यश आले.
मात्र स्वाती कुंभार याचे संपूर्ण घर आ गीत जऴून खाक झाले.यात त्याचे जवळपास दहा लाखाचे नुकसान झाले.
नुकसान ग्रस्थानाशासनाकडुन आर्थिक मदत व्हावी.अशी मागणी सिंगीनकोप नागरीकातुन होत आहे.
