संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदाही डाँ.जग जीवनराम यांची११९ वी जयंती दि.५ एप्रिल रोजी साजरी होणार आहे.या निमित्त पूर्व तयारी बैठक बुधवारी दि.१८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तालुका पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
त्याचबरोबर डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दि.१४ एप्रिल रोजी साजरी होणार आहे.या निमित्त पूर्व तयारी बैठक बुधवारी दि.१८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता तालुका पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
खानापूर शहरातील नागरीकानी उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
