#सोमवारी व मंगळवारी विविध कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील चिगुळे गावची ग्राम देवता व नवसाला पावनारी श्री देवी म्हातारीबाय मंदिराचा तिसरा वर्धापनदिन सोमवारी दि.९ फेब्रुवारी व मंगळवारी दि.१० रोजी संपन्न होत आहे.
सोमवारी दि.९ रोजी सकाळी श्रीम्हातारीबाय देवी व श्री माऊलीदेवीला अभिषेक,१०वाजता श्रीदेवी म्हातारीबायच्या चांदीच्या मोहराचा मुखवटा,दुपारी स्टेजचे पुजन व उदघाटन तर दुपारी ३.३० वाजता हळदी कुंकवाचा कार्यक्रम,रात्री भजनाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
मंगळवारी विविध कार्यक्रम!
मंगळवारी दि.१० रोजी सकाळी महाभिषेक आरती,नैवेद्य व विधी.सकाळी श्रीदेवी म्हातारीबायच्या चांदीच्या मोहर्याचा मुखवटा,सत्यनारायण पुजा,त्यानंतर तीर्थ प्रसाद होईल.दुपारी महाप्रसादाचे आयोजन होईल,सायंकाळीओटी भरण्याचा कार्यक्रम त्यानंतर भजनीचा कार्यक्रम रात्री सत्कार समारंभ व सभेचे आयोजन.त्यानंतर सवाल या कार्यक्रम होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक ,सामाजिक कार्यकर्ते गणपत गावडे हे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे उदघाटन अशोक गावडे,अनंत चौगुले,रेमा घाडी,भीमराव गावडे,चंद्रकांत नाईक
दत्ताराम गवस, तानाजी हरिजन यांच्याहस्ते होणार आहे.
दिप प्रज्वलन महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर,आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आम दार अरविंद पाटील,एमएलसी चन्नराज हट्टीहोळी, मा जी आमदार अनिल बेनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, अमित पाटील आदीच्या हस्ते होणारआहे. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पुजन होणार आहे.