संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या इयत्ता १० वी व्याख्यानमालेला सन २००९ साली सुरूवात होऊन आज १७ वर्षे पूर्ण झाली.याला तालुक्यातील सर्व थरातुन प्रतिसाद मिळाला.त्यामुळेच आजही खानापूर तालुक्यासह इतर तालुक्यातुन ही व्याख्यानमालेला १० वीच्या विद्यार्थ्यीना भरभरून मार्गदर्शन मिळालेेले आहे.हे केवळ सर्वाच्या सहकार्याने यशस्वि डाले आहे.असे विचार खानापूर ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक व चेअरमन पिटर डिसोझा यानी रविवारी दि. ८ रोजी लोकमान्य भवनात आयोजित १० वी व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाली.
यावेळी प्रास्ताविक ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजी जळगेकर यानी केले.
व्यासपिठावर डी.पी. वागळे संचालक लोकमान्य एज्यूकेशन सोसायटी,डी बी पाटील माजी चेअरमन रोटरी क्लब आँफ वेणूग्राम बेळगाव,प्राचार्या सौ.शरयू कदम, समन्वय अधिकारी मंजुनाथ हत्ती,सौ.पुजा भडांगे,उद्योजक नामदेव पाखरे, लक्ष्मण मोरे,निवृत्त मुख्याध्यापक बी जे बेळगावकर, ट्रेजरी अधिकारी भोजराज पाटील, पुडलिंक पेडणेकर,डाॅ.शुभांगी जत्तीआदी उपस्थित होते.
यावेळी ज्ञानवर्धिनी जीवनगौरव पुरस्कार गुरूवर्य माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी याना शाल, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पहार घालुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर ज्ञानवर्धिनी ज्ञानार्थन पुरस्कार सौ.स्नेहा देसाई याना देण्यात आला, तसेच आदर्श सरपंच नंदगड ग्राम पंचायत चेअरमन यल्लापा गुरव याना ज्ञानवर्धिनी जीवन पुरस्कार देण्यात आला.सुब्रह्मण्यम साहित्य अँकॅडमी माचीगड व मराठी संस्कृतीक प्रतिष्ठान याना ज्ञानवर्धिनी गौरव पुरस्कार देऊन गैरविण्यात आले. तसेच ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजी जळगेकर यांचा यशस्वि उद्योजक म्हणून मान्य वर याच्याहस्ते मान चिन्ह,पेटी व स्मृति चिन्ह दे ऊन सत्कार करण्यात आला. तसेच दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम, व्दितीय,तृतीय क्रमांक सह इतर गुणवंत विद्यार्थ्याचा रोख रक्कम, मान चिन्ह, सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर निवृत्त शिक्षकाचा सत्कार व रिसोर्स पर्सन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी डी पी वागळे व सौ.पुजा भडांगे आदीनी विचार मांडले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक,शिक्षक,
मुख्याध्यापकमोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीव वाटूपकर व मुख्याध्यापक महेश सडेकर यानी केले.
तर आभार निवृत्त मुख्याध्यापक व्ही. बी. होसुर यानी मानले.