संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
वड्डेबैल ( ता.खानापूर ) येथील ग्राम दैवत श्रीमहालक्ष्मी मंदिर जिर्णोध्दार निमित्त मंदिराच्या इमारतीचा चौकट पूजन व माहेरवासीयांचा सत्कार समारंभ असा कार्यक्रम आज बुधवारी दि.४ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष श्रीमान के.पी. पाटील उपस्थित राहणार आहेत.
या वेळी चौकट पुजन बिळकी अवरोळी मठाचे स्वामी श्री श्री श्री चन्नबसव देवरू रूद्र स्वामी यांच्याहस्ते होणार आहे.
उदघाटन कार्यक्रमाला महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, एम एल सी चन्नराज हट्टीहोळी,आमदार विठ्ठल हलगेकर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, काॅग्रेस नेता सुरेश जाधव,लक्ष्मण पाटील फुलाचे व्यापारी आदी उपस्थित राहणार आहेत.
या वेळी दीप प्रज्वलन भाजप नेत्या सौ.धनश्री सरदेसाई, श्रीमती हेमलता कदम शिक्षिका,सदानंद पाटील एम.डी.,माजी जि .प.सदस्य नारायण कार्वेकर,अँड.ए.डी.नदाफ,समिती ने ते गोपाळ पाटील,आमटे पी के पी एस संस्थापक चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर ,वकील संघटना अध्यक्ष,व खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, समिती नेते मुरलीधर पाटील, बाळाराम शेलार, भाजप नेते बाबूराव देसाई आदीच्याहस्ते होणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन होणार आहे.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमहालक्ष्मी जिर्णोध्दार कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
