#खानापूर काॅन्ट्रक्टर संघटनेचे सुभाष चलवादी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात सुरू असलेल्या सरकारी जनरल हाॅस्पटलच्या शंभर खाटांच्या जनरल तालुका हाॅस्पिटलचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चलवादी यानी बांध काम स्थळाची पाहणी करताना बोलताना दिली.
या वेळी बोलता ना ते म्हणाले की, गेेल्या १५ ते दिवसा पूर्वी पहिल्यांदा याठिकाणी भेट दिली.याभेटीच्यावेळी काॅलम घालताना खालच्या बाजूस खडी ऐवजी मातीचा वापर केला होता.परिणामी काॅक्रीट निकृष्ट दर्जाचे होत असुन काॅक्रिट निखऴुन पडत आहे.काही कालम वाकलेले दिसुन आले.त्यामुळे ही इमारत केवळ पाच वर्षातच कोसळुन पडण्याचा धोका संभवतो आहे.
अशी शंका खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चलवादी यानी वर्तविली आहे.
हे खानापूर तालुका सरकारी जनरल हाॅस्पिटलची इमारत उभारण्यासाठी नाबार्डच्या आय. आर.डी.एफ.,योजनेतुन मंजुर झाली.या इमारतीसाठी ३७ कोटी रूपयाचा निधी मंजुर झाला आहे.
परंतु आता या इमारतीचा दर्जा चांगला नाही.असा आरोप ही त्यानी केला.
तेव्हा तालुक्याचे आमदार व जिल्हा पंचायत सीईओ अधिकार्यानी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
या वेळी खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चलवादी व सदस्य रमेश शिंगनाथ उपस्थित होते.

