संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गुंजी ( ता.खानापूर ) येथील ग्राम पंचायती च्या वतीने ग्रामस्थांनी गाव स्वच्छता, कर भरणा करून ग्राम विकासामध्ये सक्रिय सहभागी व्हावे . शिवाय येथील विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना धावण्याची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांतून धावपटू, खेळाडू निर्माण व्हावेत हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंजी ग्रामपंचायतीच्या
वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये जवळजवळ २०० ते २५० विद्यार्थी व नागरिकांनी भाग घेऊन यशस्वी केल्याने ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. ही स्पर्धा अठरा वर्षा खालील आणि अठरा वर्षावरील महिला व पुरुषांसाठी पाच किलोमीटर व दहा किलोमीटर धावण्यासाठी ठेवण्यात आली होती.
ग्रामपंचायत अध्यक्षा आणि आमदारांच्या हस्ते या मॅरेथॉन शर्यतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ५ कि.मी. अठरा वर्षाखालील पुरुष गटात अनुक्रमे मधुसूदन काळीचे, कृष्णा पाटील, ईश्वर लोहार. महिला गट- पौर्णिमा अक्षीमणी, गोपिका काळीचे, काजल गावडे. अठरा वर्षावरील पुरुष गटात श्रीनाथ करंबळकर, अनिश बांदोडकर, व्यंको घाडी. महिला गटात-संथिया पिंटो, श्रावणी शास्त्री, हर्षदा मनोळकर. अठरा वर्षावरील.१० कि.मी. पुरुष गटात श्रीहरी करंबळकर, रोहित आळवणे, कार्तिक बिरजे, महिला गटात प्रतीक्षा घाडी, तनिष्का गोरल, विद्या गोडसे. अठरा वर्षाखालील पुरुष गटात नागराज आळवणे, तेजस गुरव, परसराम करंबळकर. यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. या खेळाडूंना समारंभ पुर्वक मान्यवरांच्या हस्ते चषक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचबरोबर या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट आणि मेडल देण्यात आले. यावेळी गुंजी ग्रामपंचायतचे अध्यक्षा, सदस्य, पिडिओ, गुंजीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे शारीरिक शिक्षक, आणि ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो-मॅरेथॉन स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांसह ग्रा.पं. अध्यक्षा, सदस्य पीडीओ आणि प्रतिष्ठित नागरिक.

