#अध्यक्ष, सदस्यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील निलावडे ग्राम पंचायतीचे लिपीक लक्ष्मण देसाई याचा वाढदिवस नुकताच साधेपणाने साजरा करण्यात आला.
त्यानिमित्त निलावडे ग्राम पंचायतीचे अध्यक्ष, सर्व सदस्यांच्या उपस्थित वाढ दिवसाचा सोहळा साधेपणाने पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष अरूण गावडे होते. सदस्य विनायक मुतगेकर (कांजळे),महादेव कवळेकर(निलावडे),परशराम गावडे
(ओतोळी).सहदेव पाटील (कापोली,के.सी.)
आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक पी डी ओ श्री. मोकाशी यानी करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना माजी उपाध्यक्ष विद्यामान सदस्य विनायक मुतगेकर बोलताना म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासुन लिपीक लक्ष्मण देसाई हे प्रामाणिक सेवा बजावतात.सर्व सदस्यांच्या सहकार्याने निलावडे ग्राम पंचायत क्षेत्रातील घर पट्टी, पाणी पट्टी, इतर वसुली करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.लोकाशी आदराने वागतात. त्यामुळे ते सर्वाचे प्रिय आहेत.
या वेळी ग्राम पंचायत अध्यक्ष अरूण गावडे यानी बोलताना म्हणाले की , गेल्या पाच वर्षात आम्ही सर्व सदस्य कोणते काम सांगीतले की ते वेळेत करून दाखवत.त्यांचा प्रामाणिक पणा हा इतरांनी घेण्यासारखा आहे.कर्मचारीवर्ग एकमेकाच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक गावाचा विकास करण्यास खुप प्रयत्न करतात. त्यामुळेच तालुक्यातच निलावडे ग्राम पंचायतीने साधलेला विकास इतर ग्राम पंचायती पेक्षा चांगल्या दर्जाचा आहे.कारण निलावडे ग्राम पंचायतीच्या कर्मचारी एकमेकाला चांगले सहकार्य करतात त्यामुळे पाच वर्षे कशी निघुन गेली हे कळलच नाही.असे सागीतले.
यावेळी पीडीओ श्री मोकाशी म्हणाले की, लिपीक लक्ष्मण देसाई यांच्याकडुन आज पर्यत जे सहकार्य मिळाले, कामात प्रामाणिक आहे. त्यामुळेच निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गावाचा विकास होऊ.शकला. त्यामुळेच तालुक्यात निलावडे ग्राम पंचायतीची विकास कामे दिसुन आली आहेत. याबद्दल मला अभिमान वाटतो.
असेच सहकार्य या पुढे द्याल, अशी आपेक्षा केली.
या वेळी सेक्रेटरी राजू तलवार यानी ही आपले विचार मांडले.
या वेळी ओमाणा नाईक, गावचे नागरिक उपस्थित होते.

