#महाप्रसादाचे आयोजन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील आंबोळी गावची ग्राम देवता श्री माया देवीचा वर्धापन दिन शुक्रवारी दि.३० रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
शुक्रवारी सकाळी श्री माया देवीला अभिषेक घालुन विधिवत पुजा करण्यात आली.
या वेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधुन श्री सत्य नारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री मायादेवीचे मानकरी यांच्याहस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर भाविकाना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
महाप्रसादाला निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील आंबोळी,कांजळे, बांदेकर वाडा सह इतर गावातील. हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या श्री माया देवीच्या वर्धापन दिनाला आंबोळी गावातील अबालपासुन वृध्दापर्यत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वर्धापन दिनाला खानापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते यशवंत बीरजे, खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य समितीचे अध्यक्ष व निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य विनायक मुतगेकर, गावचे शंकर शास्त्री व गावचे पंच तसेच देवस्थान कमिटीचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

