#रट्टीहळ्ळी येथील बैठकीत पदाधिकार्यांची निवड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्याच्या हवेरी जिल्ह्यातील रट्टीहाळ्ळी तालुक्यात रट्टीहळ्ळी शहरातील श्री धर्मगिरी बारामहल मठात रट्टीहळ्ळी तालुका मराठा समाजाची बैठक नुकसान पार पडली.
याबैठकीत रट्टीहळ्ळी तालुका मराठा समाज संघटनेच्या पदाधिकार्याची निवड करण्यात आली.
या वेळी मराठा समाज तालुका अध्यक्षपदी श्री.नारायणराव पवार ,गौरवाध्यक्षपदी श्री. वामनराव नलवडी ( मासुर ), उपाध्यक्षपदी श्री.वीरेश ईशप्पनावर तर सरच्टणीसपदी श्री. संतोषकुमार पवार यांची निवड करण्यात आली.
या वेळी बैठकीला रट्टीहळ्ळी तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष आण्णाप्पा साळुंके, सचिव प्रवीण नायकवाडी, के.वाय. बाजीरायारा, रायण्णा कारथा, बसाण्णा बागोडी, श्रीनिवास भैरप्पणावर, यल्लापा मराठा आदी उपस्थित होते.
