#विनायक मुतगेकर यांच्या नेतृत्वखाली निलावडे ग्राम पंचायतीच्या सदस्यांचा ईशारा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिमभागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कान्सुली क्राॅस ते मलप्रभा नदीवरील आंबोली पुला पर्यताचा रस्ता खड्डेमय झाला आहे. जागोजागी खड्डयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे तारेवरची कसरत होत आहे.
याभागातील गरोदर महिलाना दवाखाण्याला येजा करताना तसेच आजारी माणासाना या खड्डेमय रस्त्यामुळे मोठा धोका पत्करावा लागत आहे.जीवाला धोका संभवत आहे. कै.माजी आमदार अशोक पाटील यांच्या काळात या रस्त्याचे डांबरकरण. झाले.त्यानंतर गेल्या कित्येक वर्षापासुन या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही.
तेव्हा संबधीत पी डब्लूडी खात्याच्या अधिकार्यानी येत्या आठ दिवसात कान्सुली क्राॅस ते मलप्रभा नदीवरील आंबोळी पुलापर्यतच्या रस्त्याचे खड्डे बुजवून पॅचवर्क केले नाही तर, कान्सुली,आंबोळी,कबनाळी, मुघवडे,बांदेकरवाडा,कोकणवाडा,मळव,हरिजन केरी,गवळीवाडा, आल्लोळी आदी गावचे नागरिक व निलावडे ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य यानी सदस्य विनायक मुतगेकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोकोचा इशारा दिला. तसेच लोकप्रतिनिधीनी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निजी मंजुर करून रस्त्याची समस्या मार्गी लावावी.अशी मागणी याभागातील नागरीकानी केली आहे.

