संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
चापगाव (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या पावती पुस्तकाच्या अनावरण नुकताच पार पडले
प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश कवळेकर यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत श्री कुकडोळकर यांनी केले.
यावेळी पावती पुस्तकांचे अनावरण शिवोलीचे उद्योजक मुकुंदराव पाटील, निवृत्त हायस्कूल मुख्याध्यापक बी ए पाटील ,अल्लेहोळचे उद्योजक नारायण विठ्ठल पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती गंगव्वा कुरबर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रमेश धबाले उपस्थित होते. तर व्यासपीठावर शतक महोत्सव कमिटीचे अध्यक्ष विलास धबाले , उपाध्यक्ष महादेव दळवी, खजिनदार व एसडीएमसीचे अध्यक्ष मष्णू चोपडे, उदय पाटील, जयदेव अंबाजी, बशीर सनदी, नागराज धबाले, बाबू तळवार, रुक्माना धबाले, महादेव पाटील, अभिजीत पाटील , अरुण धबाले, अभिषेक सुतार , अल्लेहोळचे कृष्णा कल्लाप्पा पाटील, वड्डेबैलचे लक्ष्मण पाटील शाळेचे मुख्याध्यापक , सहशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
