अजून किती जणांचे बळी पाहिजे, जनतेचा सवाल?
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यात हलशी हलगा नागरगाळी रस्ता काही वेगळा नाही आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून हलशी हलगा नागरगाळी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकासह दुचाकी स्वराना वाहने चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रस्त्याच्या दुर्दशीमुळे या भागातील बसेस सुद्धा वेळेवर धावत नाही आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहने चालवताना खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वेळा वाहने खड्ड्यात जाऊन वाहनधारकांना दुखापत झाली आहे. एवढेच नव्हे तर अनेक दुचाकी स्वारांचा बळी गेला आहे.
तर कित्येक वेळा बसेस नादुरुस्त होऊन रस्त्याच्या मध्येच थांबतअसत. तरी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी हलशी हलगा नागरगाळी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळे कित्येक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचे सुवेर सुतक या अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना नाही आहे काय? असा सवाल या भागातील नागरिकांतून विचारला जात आहे.
