#मानचिन्ह, शाल, पुष्पहार घालून सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव येथील सरकारी मराठा शिक्षक कल्याण संघ यांच्या वतीने कुमार गंधर्व रंगमंदिरात रविवार दिनांक 23 रोजी गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मच्छे येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सहशिक्षिका सौ. एन. बी . बाळेकुंद्री यांना गुरु गौरव कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक पाटील होते. तर कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, बैलहोगलचे माजी आमदार व्ही.आय. पाटील, शहर गट शिक्षण अधिकारी रवी बजंत्री, तालुका गटशिक्षणाधिकारी आर. के. अंजनेय आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेखर करंबळकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम ए मुल्ला यांनी केले. आभार वाय. सी. बागेवाडी यांनी मानले.
कार्यक्रमाला बेळगाव तालुक्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.