#”खानापूर भाजप पक्षाचा खरा आधारस्तंभ म्हणजे भाजप नेते संजय कुबल”!
खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका भाजप पक्षाला खरे बळ देणारे, पक्षा साठी रात्रंदिवस झटणारे नेते म्हणजे खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ नेते संजय कुबल हे होत. एकेकाळी खानापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाला नेता मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत तालुक्यातील कार्यकर्त्याशी चांगले संबंध ठेवून त्यांच्याशी प्रामाणिकपणे पक्षाच्या कार्यासाठी झटणारे एकमेव नेते म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते त्यामुळेच आज खानापूर तालुक्यात भाजप पक्षाला दोन वेळा आमदारकी मिळाली आहे. याचे खरे श्रेय संजय कुबल यांना दिले जाते. असे मत कारवार मतदार संघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी गुरुवार दिनांक 6 रोजी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात संजय कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना व्यक्त केले.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर व भारतीय जनता पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित होते.
खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते संजय कुबल यांचा शाल ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कुबल यांनी पक्षाच्या प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला. खानापुरात म.ए.समितीशी निकराने टक्कर देत खानापूरात भाजपचा पहिला आमदार म्हणून प्रल्हाद रेमाणी यांना निवडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच खानापुरात भाजपचे दोन आमदार झाले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पक्षाचे कोणतेही काम ते प्रामाणिक व योग्य रीतीने हाताळतात त्यामुळेच पक्षाला आज चांगले दिवस आले आहेत. त्यांनी पक्षाकडे कोणत्याच पदाची अपेक्षा केली नाही. त्यांनी पक्षासाठी तन मन धन देऊन कार्य केले आहे. यापुढेही ते पक्षासाठी कार्यरत राहतील. त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शतायुष्य लाभो असे मी परमेश्वरी प्रार्थना करतो. व त्यांचे आयुष्य सुखा समाधानाचे जावो. ही शुभेच्छा.
यावेळी तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते ,मित्र मंडळ आदींनी पुष्पगुच्छ, शाल व व भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी खानापूर तालुका भाजपचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
