, # खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्याहस्ते संताचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदाही खानापूर शहरातील विठोबा मंदिरात काकड आरतीची सांगता गुरुवार दिनांक ६ रोजी विठोबा मंदिरात उत्साहात पार पडली.
यावेळी पहाटे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीना अभिषेक घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. काकड आरती, भजन आदी कार्यक्रम पार पडले.
काकड आरती सांगता समारंभात खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी उपस्थिती दर्शवून वारकऱ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला.
यावेळी बोलताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी म्हणाले की, काँग्रेस सरकारकडून कीर्तनकार व वारकरी यांना कायमस्वरूपी पेन्शनचा लाभ होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे वारकऱ्यांना तसेच कीर्तनकारांना याचा फायदा होईल. असे सांगून ते म्हणाले की , खानापूर विठोबा मंदिरात काकडा आरतीचा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. हा कार्यक्रम असाच अखंड चालू राहू दे. त्यामुळे शांतता, भक्ती वर्गाचा प्रसार होईल, प्रत्येक जण भक्तीकडे वळेल. या काकड आरतीने मला खूप समाधान वाटले. असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विठोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने दोन संतांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये मनोहर चौगुले, नामदेव सुतार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
काकड आरती कार्यक्रमाला ट्रस्टचे प्रकाश देशपांडे, श्री दलाल, ट्रस्टचे सदस्य तसेच खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, शहरातील वारकरी, संत मंडळी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊ चव्हाण यांनी केले.
