#शिव स्वराज जनकल्याण फाउंडेशन च्या वतीने निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून खानापूर तालुक्यात जना स्पंदन सभांचे आयोजन करण्यात आले नाही. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या विविध तक्रारी सामाजिक योजना अशा अनेक अडचणी चे निवारण अद्याप झालेच नाही.
यासाठी जनस्पंदन कार्यक्रम तालुक्यात राबवणे गरजेचे आहे. अशा अशा मागणीचे निवेदन शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशन वतीने खानापूरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्यात एकेकाळी जनस्वंदन कार्यक्रम खेडोपाडी मोठ्या उत्साहात होत होते. परंतु अलीकडे गेली किती वर्षापासून जनस्पंदन कार्यक्रमाचे आयोजन होत नाही. त्यामुळे खेडोपाडी नागरिकांच्या समस्या, विविध तक्रारी तसेच संबंधित योजना याची माहिती नागरिकापर्यंत पोहोचत नाही यासाठी जनस्पंदन कार्यक्रम खानापूर शहरास खेडोपाडी घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी खानापूर तहसील कार्याचे उप तहसीलदार श्री.मेगिरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून जनस्पंदन कार्यक्रम घेण्याच्या आश्वासन दिले.
निवेदन देताना संघटनेचे उपाध्यक्ष रमेश धबाले (चापगाव), मुकुंद पाटील, अँड. अभिजीत सर देसाई, सुनील पाटील संदेश कोडचवाडकर, भाऊ पाटील, हनुमंत पाटील, ऋतिक पाटील, यल्लाप्पा कदम आदी उपस्थित होते.
