“खानापुरात पी एल डी बँकेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न”
#बँकेला 13 लाखाचा नफा चेअरमन मुरलीधर पाटील यांची वार्षिक सभेत माहिती!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका पी एल डी बँकेचे ५७ वी. सर्वसाधारण सभा बँकेच्या सभागृहात नुकताच उत्साहात पार पडली. वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन मुरलीधर पाटील होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, यंदा खानापूर पी एल डी बँकेला 13 लाखाचा 14 हजार रुपये नफा झाला आहे. पी एल डी बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी धडपडत असते. यापुढेही शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा अधिकाअधिक लाभ मिळवून देण्यास सतत प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.
प्रगतीचा आढावा देताना ते म्हणाले बँकेचे सुमारे97 लाख रुपये भाग भांडवल असून यावर्षी 18 कोटी,32 लाख रुपये वार्षिक उलाढाल झाली आहे.
यावेळी व्यवस्थापक जयसिंग राजपूत यांनी अहवाल वाचन केला. तर माजी आमदार अरविंद पाटील, यशवंत बिरजे, विश्वनाथ डिचोलकर, कल्लाप्पा घाडी, यशवंत धबाले,गुंडू हलशिकर, आदींची भाषणे झाली.
सभेला व्हाईस चेअरमन लक्ष्मण कसरलेकर, विरूपाक्ष पाटील, सुदीप पाटील, अशोक पाटील, सुभाष गुरव ,नारायण पाटील, निळकंठ गुंजीकर ,सुनील चोपडे ,यल्लाप्पा राठोड ,श्रीकांत करजगी, शंकर सडेकर, संजय कुबल ,के.पी.पाटील, महादेव घाडी ,राजेश पाटील, म्हात्रू धबाले आदी उपस्थित होते.
सुनील चौगुले यांनी आभार मानले.

