संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
मुळचे तोपिनकट्टी ( ता खानापूर) गावचे सुपुत्र सध्या राहणार जगलबेट (ता. जोयडा) येथील व वाळपई गोवा येथून निवृत्त झालेले निवृत्त शिक्षक पुंडलिक सोमना कुंभार वय 86 यांचे रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी वृद्धपकालीन निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, चार विवाहित मुली, सुन, जावई, नातवंडे, पणंतवंडे असा परिवार आहे.
खानापूर येथील समर्थ सोलर चे मालक जगदीश कुंभार यांचे ते वडील होत. तर खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष निवृत मुख्याध्यापक ए बी मुरगोड यांचे ते सासरे होत. तसेच खानापूर तालुका शिक्षक सोसायटीच्या संचालिका सौ जे. ए. मुरगोड यांचे ते वडील होत. तर रामनगर बापूजी पियू कॉलेजच्या प्राध्यापिका सौ भारती कुंभार यांचे ते सासरे होते.
त्यांच्या अंत्यविधी आज रविवारी सायंकाळी पाच वाजता जगलबेट (तालुका जोयडा ) येथे होणार आहेत.