#मोठा गट व लहान गट!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
दोडहोसूर (ता खानापूर) येथे शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता एका बैलगाडीची चाकी न बांधता बैलजोडीने गाडी ओढण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
#ही शर्यत दोन गटात आयोजित करण्यात आली आहे!
मोठ्या गटातील विजयी बैलजोडी मालकांना बक्षिसे अनुक्रमे रु. २५,१०१, रु.२१,१०१, रु.१७,१०१, रु.१५,१०१, रु .१२,१०१ अशी एकूण 14 बक्षिसे देण्यात येणार आहेत.
लहान गटातील विजयी बैलजोडी मालकांना बक्षीसे अनुक्रमे रु.११,१०१ रु.९,१०१, ,रू.७,१०१, रु.५,१०१, रु.४,१०१ अशी एकूण 11 बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तरी हौशी बैल जोडी मालकाने या शर्यतीचा लाभ घ्यावा. असे आयोजकांनी कळविले आहे.
