#गणेबैलच्या शेतकऱ्याच्या बैलावर गविरेड्याचा हल्ला !
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति जंगलांनी व्यापलेला आहे. या तालुक्यात जंगली प्राण्यांचे हल्ले दिवसांनी वाढत आहेत. गेले कित्येक वर्षापासून अस्वल, बिबट्या, गविरेडे , यासारख्या.हिंस्त्र प्राण्याचे हल्ले कधी माणसावर तर कधी पाळीव प्राण्यावर होतच आहेत.
अशाच प्रकारचा हल्ला खानापूर तालुक्यातील गणेबैल-काटगाळी रोडवरील जंगल भागात असलेल्या शेतवाडीत गविरेड्याने एका बैलावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या बैलाच्या तोंडाखालचा भाग फाडून टाकला आहे. त्यात बैलाची जीभ तसेच दात बाहेर आलेत.
लागलीच पशु खात्याच्या वैद्याधिकाऱ्याला पाचारण करण्यात आले. मात्र उपचार करण्यास कोणतीच सोय नसल्याने उपचार होणे कठीण आहे असे सांगितले. सबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाईची मागणी गणेबैल शेतकरीवर्गातून होत आहे.
यावेळी गणित परिसरातील पुंडलिक गुरव, रमेश कवठनकर ,मीनाजी गुरव, ज्ञानेश्वर गेजपतकर, मारुती गुरव, नारायण कोलेकर आधी शेतकरी उपस्थित होते.
