“खानापूर तालुका भाजप जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी यांचा पक्षाच्या वतीने वाढदिवस साजरा”
#भाजप पक्षाच्या मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुका जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी यांचा वाढदिवस शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी खानापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधमात करण्यात आला.
प्रारंभी तालुका प्रधान कायदेशी मल्लाप्पा मारिहाळ यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी खानापूर तालुका माजी भाजपाध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, भाजप नेते वकील चेतन मनेरीकर, एम.डी. सदानंद पाटील, राजेंद्र रायका , शंकर पाटील आदींनी खानापूर तालुका भाजप जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी यांनी सेक्रेटरी पदाची हॅट्रिक केली आहे. कारण भाजप पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाची धुरा खांद्यावर घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा होता. पक्षाच्या प्रत्येक कामात ते स्वतःला झोकून देऊन काम करत होते. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा असे. त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणूनच त्यांना तीन वेळा भाजप तालुका सेक्रेटरी पदाचा मान मिळाला आहे.
त्यांच्या पत्नीही नगरसेविका असल्याने त्यांच्यात समाजकार्याचा वसा कायम चालू आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याने ते सर्वांना प्रिय आहेत. भाजप पक्षाच्या प्रगतीसाठी ते सतत धडपडत असतात. असे विचार वरील मान्यवरांनी आपल्या भाषणात बोलताना व्यक्त केले.
यावेळी सत्कारला उत्तर देताना खानापूर तालुका भाजप जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी म्हणाले की सर्वांनी आतापर्यंत मला खूप सहकार्य केले त्यामुळेच मी तीन वेळा जनरल सेक्रेटरी पदाची धुरा सांभाळू शकलो. यापुढेही असे सहकार्य करून भाजप पक्षाच्या कार्यासाठी काम करण्यास मदत करावी. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. असे मत व्यक्त केले.
यावेळी भाजप कार्यकर्ते सुनील मासेकर, यशवंत गावडे, गजानन पाटील, मोहन पाटील, श्री शास्त्री, रवी पाटीलसह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आभार प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारिहाळ यांनी मानले.