“खानापुरात डीसीसी बँकेच्या निवडणुकीचे वारे थंडावले .”
#माजी आमदार व डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील यांची मजबूत पक्कड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गेल्या चार महिन्यापासून खानापूर तालुक्यात डीसीसी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू होती. मात्र डीसीसी बँकेच्या निवडणुकीची तारीख तोंडावर येताच खानापूर तालुक्यातील निवडणुकीची रणधुमाळी थंडावली.
एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनी गेल्या तीन ते चार महिन्यापासून डीसीसी बँकेच्या निवडणुकी साठी जोरदार प्रयत्न केला होता. त्यामुळे खानापूर तालुक्यात डीसीसी बँकेचे निवडणूक रंगतदार होणार. अशी चर्चा चालू असतानाच अचानकपणे डीसीसी बँकेच्या निवडणुकीची दिशा बदलली आणि खानापूर तालुक्यात डीसीसी बँकेच्या निवडणुकीचे वारे थांबले. सध्या तालुक्यात डीसीसी बँकेच्या निवडणुकीबद्दल चक्कर एक शब्द चर्चा होताना दिसत नाही. याचे आश्चर्य खानापूर तालुक्यातील जनतेतून वाटत आहे.
अलीकडे खानापूर तालुक्यातील ५६ पीकेपीएस सोसायटीच्या संचालकातून शांतता दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पी के पी एस सोसायटीच्या संचालकांनी काही दौरे केले. परंतु एमएलसी चन्नाराज हट्टीहोळी यांनी डीसीसी बँक निवडणूक माघार घेतल्यानंतर खानापूर तालुक्यातील पी के पी एस संचालकांना आता मतदाना व्यतिरिक्त कोणताच लाभ होणार नाही.
कारण माजी आमदार व डी सी सी बँक संचालक अरविंद पाटील यांच्या विरोधात आता कोणीच आवाज उठवायला तयार नाहीत. सगळीकडे स्मशान शांतता आहे. त्यामुळे डीसीसी बँकेवर माजी आमदार अरविंद पाटील हे नक्की निवडून येणार अशी खानापूर तालुक्यात चर्चा सुरू आहे.
खानापूर तालुक्यात पी के पी एस सोसायटीना आम. हलगेकराच्या प्रयत्नातून १० कोटीचा निधी!
एकीकडे खानापूर डीसीसी बँकेवर माजी आमदार व डी सी सी बँक संचालक अरविंद पाटील यांची गेली वीस वर्षे सत्ता असून भविष्यात तेच संचालक होणार याची खात्री असताना सुद्धा आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पी के पी एस सोसायटीच्या गोडाऊन साठी दहा कोटीचा निधी खानापूर तालुक्यासाठी आणला. मात्र याचा फायदा माजी आमदार व डी सी सी बँक संचालक अरविंद पाटील यांनाच झाला आहे. शेवटी डीसीसी बँक संचालकाची माळ माजी आमदार अरविंद पाटील यांच्यात गळ्यात पडणार आहे. हे नक्की आहे.
डीसीसी बँक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न असफल!
यंदाची डीसीसी बँक निवडणुक बिनविरोध होण्यासाठी खूप प्रयत्न झाले. मात्र एम एल सी चन्नाराज हट्टीहोळी यांनी डीसीसी बँक निवडणुकीत पाऊल टाकल्याने बिनविरोध निवडणूक होण्याचे स्वप्ने भंग पावली.
मात्र तेही आता माघारी घेतले. तरीसुद्धा आता माजी आमदार अरविंद पाटील यांच्या विरोधात एखादा संचालक उभा करून निवडणूक लढवण्याची लक्षणे दिसत आहेत. तेव्हा येत्या 19 ऑक्टोबर रोजी डीसीसी बँकेची निवडणूक होणार आहे.
