संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मूळचे खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीत रहिवासी सध्या राहणार शिवाजीनगर ओमकार हॉटेल शेजारी येथील निवृत्त शिक्षक मानसिंग गावडे पाटील यांचे गुरुवार दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी दुपारी हॄदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा , सून व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधी सायंकाळी साडेसहा वाजता मलप्रभा नदी घाटावर होणार आहेत.