स्थळ: संभाजी चौक येडोगा रोड चापगाव!
संदेश कांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगाव ( ता खानापूर) येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली च्या वतीने खास दसऱ्यासनानिमित्त सोमवार दि. 28 रोजी सकाळी दहा वाजता एका माणसाने रिकामी बैलगाडी ओढण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
विजयी स्पर्धकांना बक्षीसे अनुक्रमे रुपये 7001 , रुपये ५००१,रुपये 3001, रुपये 2001 , रुपये 1001, रुपये 501, स्टील कळशी, स्टील बादली, तर उत्तेजनात बक्षीस देण्यात येणार आहे. ही सर्व बक्षिसे ग्रामपंचायत सदस्य नागराज येळूरकर यांच्याकडून देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मष्णू सुतार उपस्थित राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत सदस्य नागराज यळूरकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी स्पर्धकांनी या शर्यतीचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
