विजयोत्सव साजरा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
एम के हुबळी मलप्रभा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या रविवारी दिनांक 28 रोजी झालेल्या 15 संचालकांच्या निवडणुकीत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व एमएलसी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पुनश्चैतन पॅनलने विजय मिळवला.
या निवडणुकीत झालेल्या
मतदानात49.45% मतदान झाले.
रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान झाले. 15 संचालक पदासाठी एकूण 44 उमेदवार रिंगणात होते.
या निवडणुकीत 16, 903 मतदारांपैकी ८३५९ शेतकरी मतदाराने मतदान केले.
यामध्ये विजयी मतदार, एम एल सी चन्नाराज हट्टीहोळी 4731 मते, श्रीकांत इटली 4424 मते, शिवणगौडा पाटील 4349 मते, शंकर किल्लेदार 4245 मते, श्रीशैल तुरमुरी 4183 मते, शिवपुत्र मराठी 4183 मते, रघु चंद्रशेखर पाटील 3829 मते, रमणगौडा पाटील 3735 मते., सुरेश होली कट्टी 3668 मते, फकीरापा सक्रेनावर 4142 मते,अ मतदार संघातून शंक्रेप्पा होळी 4507, महिला गटातून ललित भालचंद्र पाटील 4041 मते, सुनिता लंगोटी 3913 मते, एस सी गटातून बाळाप्पा पुजार 3827 मते एसटी गटातून भरमप्पा शिगेहळळी 4161 मते घेऊन विजयी झाले.
खानापूर सह कित्तूर , बैलहोंगल
तालुक्यातील शेतकऱ्यांचा कारखाना हा गेली साठ वर्षे कार्यरत आहे. अलीकडे कारखान्याची परिस्थिती बिकटबल्याने गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये कारखाना चालवणे कठीण झाले होते.
यासाठी एक मंत्री तीन आमदार एकत्र येऊन पुनश्चेतन पॅनल आज सत्तेवर आले आहे. या पॅनल कडून कारखान्याची प्रगती व शेतकऱ्यांचे हित जपून कारखाना भरभराटीला आला पाहिजे असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
या निवडणुकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष नासिर बागवान, कामगार कल्याण व रयत संघाचे नेते बसराज मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभारल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती.