१८ व १९ ऑक्टोबर रोजी स्पर्धा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तो पिन कट्टी (ता खानापूर) येथे दिवाळीच्या सणानिमित्त 18 व 19 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच ह्या वर्षी तोपिनकट्टी गावातील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन व सत्कार करण्यात येणार आहेत.
बेळगाव जिल्हा एक गाव एक संघ व खानापूर तालुका एका बाजूला व दुसर्या बाजूने बेळगाव तालुका असे खो खो, कबड्डी खेळवता येतील.
बैठकीला माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
