#काँग्रेस नेत्यांची मागणी!
संदेश क्रांति न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील पी के पी एस सोसायटीच्या गोडाऊन बांधकामासाठी राज्य सरकारने दहा कोटीचा निधी मंजूर केले आहे. हा निधी पी के पी एस सोसायटीच्या इमारतीसाठी न वापरता खानापूर तालुक्यातील रस्ते अथवा शाळांच्या इमारतीसाठी वापरात यावा. अशी मागणी खानापूर तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडून होत आहे.
ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर खानापूर तालुक्यातील जवळपास 56 पी के पे सोसायटीच्या गोडाऊन इमारतीसाठी तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रयत्न करून सरकारकडून दहा कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे.
मात्र खानापूर तालुक्यातील पी के पी एस सोसायटीच्या प्रगतीसाठी डीसीसी बँक समर्थ आहे.
तेव्हा पी के पी एस सोसायटीच्या गोडाऊन बांधकामासाठी आलेला दहा कोटीचा निधी खानापूर तालुक्यातील रस्ते अथवा शाळा इमारतीसाठी मंजूर करावा. जेणेकरून रस्त्यांची झालेली दुरावस्था तरी कमी होईल अथवा तालुक्यातील झालेल्या शाळांच्या इमारती तरी उभारतील. यासाठी दहा कोटीचा निधी रस्ते ,शाळांच्या इमारती साठी उपयोगात आणावा. अशी मागणी खानापूर काँग्रेसने त्यांच्याकडून होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत खानापूर तालुक्यातील खेडोपाडी रस्त्यांच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. ग्रामस्थांकडून रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. शाळा इमारतीसाठी निधीची मागणी होत आहे.

