संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर मेदर गल्लीतील लक्ष्मी मंदिराचा लक्ष्मी यात्रा कमिटीच्या वतीने जिर्णोद्धार करण्यात आला आहे. या जिर्णोद्वारीत मंदिराचा वास्तुशांती व मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात पुजविण्याचा समारंभ गुरुवार दि. १४ रोजी करण्यात येणार आहे. या निमित्त मंदिरात सकाळी ८ ते १२ वाजण्याच्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मूर्तीचे मुख्य पूजा झाल्यावर सर्वांसाठी दिवसभर तीर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष नामदेव गुरव यांनी केले आहे.