#भात पिकाचे व केळी, नारळांच्या झाडांचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
घोसे के.एच. (ता.खानापूर ) येथी शेतकरी गुरूदास मिराशी यांच्या शिवारातील भात पिकांचे तसेच केळी , नारळांच्या झांडाचे हत्तीकडुन प्रचंड नुकसान झाले आहे.
घोसे के.एच गावच्या शेतकर्यानी काबाट कष्ट करून शिवारात भाताची नटी चे काम पूर्ण केले. मात्र हत्तीच्या आगमनाने शेतकरी गुरूदास मिराशी यांच्या रांगीच्या शिवारातील भात पिकात घुसुन हत्तीनी प्रंचड नुकसान केले आहे.
त्याच प्रमाणे माळ शिवारातील केळी ,नारळच्या झाडांचे ही प्रचंड नुकसान केले आहे.त्यामुळे बळीराजावर पुन्हा संकट आल्याने बळीराज हातबल झाला आहे.
कधी वरूण राजाची अवकृपा होऊन तर कधी जंगली प्राण्याकडुन पिकांचे नुकसान होते.त्यामुळे खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील बळीराजा नेहमीच आर्थिक संकटात सापडत आहे.
नुकताच भात शिवारात भात नटीचे काम संपवून बळीराजा आराम झाला होता. तितक्यातच हत्ती कडुन भात पिकांचे नुकसान झाले आहे.आता पुन्हा भात नटी लावण्यासाठी नटीचे भात मिळणे कठीण आहे. त्यामुळे भात पिकाचे उत्पन्न घेणे कठीण होणार आहे.
सुरूवातील भात पिकाचे नुकसान हत्तीकडुन झाले अजुन डिसेंबर महिण्यापर्यत भात पिकाचे संरक्षण कसे करायचे.याची चित्ता बळीराजाला लागुन राहिली आहे.
माळ शिवारातील ही केळी आणि नारळ झांडाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
तेव्हा वनखात्याने याची दखल घेऊन हत्ती पासुन पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे. शेतकर्याना नुकसान भरपाई मिळुन देण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.