#घोटगाळी पी.के पी एस सोसायटीच्यावतीने सत्काराचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
घोटगाळी ( ता.खानापूर ) येथील पी के पी एस सोसायटीचे चेअरमन डाॅ. रफिक हलशीकर याना बेडकीहाळ येथील ५ व्या मराठी साहित्य संमेलनात समाज रत्न हा पुरस्कार मिळाल्याबद्दल घोटगाळी पी के पी एस सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमुर्ती डाॅ. रफिक हलशीकर यांचा सोसायटीचे उपाध्यक्ष ,संचालक,सेक्रेटरी ,कर्मचारीवर्ग आदीच्यावतीने शाल ,श्रीफळ ,व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष यल्लापा कोलकार, संचालक शाम आपटेकर ,महादेव मिराशी , म्हाळाप्पा फटाण,सातेरी वीर,सहदेव चौरी,अकबर इनामदार,बसवाणी त्रिमीळकर, मष्णू पाटील ,संचालिका सौ सुहासिनी देसाई, पार्वती पाटील, संचालक अमर कुंभार, मॅनेजर नामदेव ब्राह्मणकर, क्लार्क महेश गुरव आदी उपस्थित होते.